

कुर्ता हे गाव दामरांचा पासून चार कि.मी वर असून हे गाव इंद्रावती व बांडिया नदीच्या मधोमध वसले असून या गावाला पावसाळ्यात बेटाचे स्वरूप प्राप्त होते.या गावात सात घरे असून तीस लोकसंख्या आहे. अश्या भौगोलिक संरचनेमुळे हे गाव शासकीय योजनांपासून कोसो दूर असून विकासापासून वंचित राहिलेले आहे.अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कुर्ता या गावाला मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नितु जोशी यांनी भेट देऊन गावकऱ्यांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले..मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नितु जोशी यांना या गावाची माहिती होताच त्यांनी सहकार्यासोबत या गावाचा दौरा केला.येथील गावकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोबतच त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.सोबतच गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.यावेळी रोहित तर्रेवार, पंकज पोटे, महेश अलोणे प्रतीक येंनमवार, संतोष आत्राम आदींची उपस्थिती होती.






