

सालेकसा : आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मजबुती ने लढविण्या संबंधात व सदस्यता नोंदणी बाबत देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासशील नेतृत्वात विश्वास करून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सालेकसा नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक व पक्षप्रवेश घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे, वरिष्ठ कार्यकर्ते डॉ. हिरालालजी साठवणे , सालेकसा शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस,माजी जिल्हा परिषद सदस्य बिसराम चर्जे, बाजीराव तरोने , महिला तालुकाध्यक्ष गीता चौधरी, महिला शहराध्यक्ष सुनीता थेर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मेघेश्याम बघेले, सोविंद फुंडे, योगिता बहेकार ,हिवराज येडे, विजय येरणे, राहुलदेव साठवणे यांनी पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी किसन रहांगडाले, डॉ. जियालाल बघेले, ओम प्रकाश लिल्हारे, मोतीलाल पटले , संतोषी चुटे, सीता अवस्थी , उषा वऱ्हाडे, सीमा बैस, छाया सेउतकर, जितेंद्र बडोले, दुरेन्द्र राणे, पन्नालाल हरीणखेडे, सोनू दसरिया, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






