संघटन बळकटीसाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन

0
166
1

गाव ते जिल्हा परिषद स्तरावर बैठकीचा निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरली

आमगांव –  तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अत्यावश्यक व महत्वाची बैठक पक्षाच्या कार्यालयात दिनांक 27 मे  रोजी पार पडली. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करत यामध्ये पक्षाची रणनीती आखण्यात आली. यासोबतच पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी गावपातळीवर, बुथस्तरावर तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होणार असून, अधिकाधिक लोकांना पक्षाच्या विचारसरणीशी जोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर कार्यकर्त्यांच्या समित्या गठीत करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी म्हाडा सभापती मा. नरेशकुमार माहेश्वरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. सुरेश हर्षे, तालुकाध्यक्ष मा. कमलबापू बहेकार, महिला जिल्हा उपाध्यक्षा मा. कविताताई राहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनांमधून पुढील कार्यवाहीस दिशा मिळाली.

बैठकीस उपस्थित प्रमुख नरेशकुमार माहेश्वरी, सुरेश हर्षे, कमलबापू बहेकार, टिकाराम मेंढे, राजेश भक्तवर्ती, रविंद्र क्षिरसागर, सीमाताई शेंडे, कविताताई राहांगडाले, लक्ष्मीताई येडे, उषाताई डोंगरे, सुनील ब्राह्मणकर, प्रमोद शिवनकर, संतोष श्रीखंडे, प्रल्हाद वंजारी, हरिचंद्र फुंडे, विनोद कन्नमवार, गिरी महाराज, महेंद्र राहांगडाले, स्वप्नील कावळे, सुमित कन्नमवार, आनंद शर्मा, तुकडोदास राहांगडाले, जयप्रकाश पटले, शामराव ठाकरे, देवराव बिसेन, यादवराव बिसेन, कमलेश बहेकार, दिलीप वैरागडे, अशोक कटरे, धनराज बोपचे, डॉ. हरिणखेडे, हरिचंद्र राहांगडाले, आनंद पटले, राधेश्याम उके, नागोराव सोनवणे, मोहनलाल पटले, श्यामदास बारापात्रे, होलीराम राहांगडाले, सौरभ डोंगरे, ऋषभ शर्मा, ललित ठाकूर, प्रकाश वंजारी, चंद्रपाल राहांगडाले, लखन भलावी, रमणलाल डेकाटे, पुरुषोत्तम चुटे, नरेंद्र कुमार बिसेन, नामदेव दोनोडे, पंचमजी मानकर, शैलेश बहेकार, धनराज बोपचे, उरकुडा अंबुले, मुलचंद गायधने, उमेश मेश्राम आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आदि मान्यवरांचा समावेश होता .

या बैठकीत घेतलेले निर्णय तालुका व जिल्हा पातळीवर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 

Previous articleवीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू – काळीमाती येथील दुर्दैवी घटना
Next articleमहायुतीचा गोंदिया बँक निवडणुकीसाठी बिगुल – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची ऐतिहासिक युती