

धम्मप्रचारकरीता गोंदिया जिल्ह्यातील विहारांना धम्म शिक्षक श्याम तागडे भेटी देणार
सडक अर्जुनी : धम्म प्रचार करण्यासाठी प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष तथा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकॅडमी, राजुलवाडी तालुका उमरेड चे धम्म शिक्षक तथा सामाजिक न्याय विभागाचे माजी अप्पर सचिव श्याम तागडे यांचा गोंदिया जिल्ह्यातील विहारांना भेटी देण्याचा तीन दिवसाचा
धम्म प्रचार मोहीम कार्यक्रम दि. २ जून २०२५ पासून आयोजित करण्यात आला आहे.
धम्मशिक्षक तथा माजी अप्पर सचिव ( आय. ए. एस) श्याम तागडे आय. ए. एस. हे धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच भगवान बुद्धांचे धम्मनुसार आचरण ( धम्मचरिया) केल्यास आपले सांसारिक व व्यवहारिक जीवनात त्याचा काय उपयोग होईल तसेच अष्टांगीक मार्गातील “सम्मा सती ” याचे अंगीकार करून ”पत्सना ” केल्याने कसे सुखपूर्वक जीवन जगता येते, याबाबत गोंदिया जिल्ह्यातील विहारांना भेटी देऊन उपासक उपासिका यांना विपशना शिबिराचे लाभ घेण्यासाठी मागदर्शन / चर्चा करणार आहेत. त्यासाठी धम्म शिक्षक शाम तागडे २ जून २०२५ ला तिरोडा,गोरेगाव, गोंदिया तालुका व ३ जून २०२५ ला आमगाव, सालेकसा व देवरी तालुका आणि ४ जून २०२५ ला सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानचे धम्मप्रचारक भंडारा येथील विनोद रामटेके यांनी कळविली आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील भेटी देण्यात येणाऱ्या नियोजित विहाराचे प्रतिनिधी, उपासक व उपासिका यांनी ठरविलेल्या व कळविण्यात आलेल्या वेळेत व तारखेला हजर राहावे असे प्रतिष्ठानचे सडक अर्जुनी येथील धम्म प्रचारक अशोककुमार लांजेवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील उपासक, उपासिका यांना आवाहन केले आहे.






