उद्या आमगाव सबस्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडित राहणार – ग्राहकांनी नोंद घ्यावी

0
407
1

११ के.व्ही. आमगाव, अंजोरा व इंडस्ट्रियल फिडरचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत बंद

आमगाव – १३२ के.व्ही. आमगाव ट्रान्समिशन सबस्टेशनवर आवश्यक देखभाल व मेंटेनन्सचे काम दिनांक ०४ जून २०२५ (बुधवार) रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत ३३ के.व्ही. आमगाव सबस्टेशन अंतर्गत येणारे खालील फिडर बंद राहणार असून, या कालावधीत संबंधित परिसराचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित राहील:

११ के.व्ही. आमगाव फिडर

११ के.व्ही. अंजोरा फिडर

११ के.व्ही. इंडस्ट्रियल फिडर

ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि वीजपुरवठा खंडित असताना आवश्यक ती पूर्वतयारी करून महावितरणच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता, आमगाव यांनी केले आहे.

आपले सहकार्य महत्त्वाचे आहे!

Previous articleगडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची आमगावमध्ये आढावा बैठक
Next articleन्या. डॉ. विक्रम आव्हाड यांना जेष्ठ नागरिकांनी दिला निरोप