

आमगाव (दि. 6 जून )— ग्राम किडंगीपार ते शिवनी या सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी आज भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला. या रस्त्याच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना मिळणार असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्याचे भूमिपूजन सौ. छबुताई महेश उके (सदस्या, जिल्हा परिषद गोंदिया) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष केशोराव सतीशहारे (सरपंच, ग्रामपंचायत शिवनी) होते.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संतोष हत्तीमारे (सदस्य, ग्रामपंचायत शिवनी), गणेश हर्षे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव), महेश उके (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव), सौ. लक्ष्मीताई मोरेश्वर भुते (सदस्या, ग्रामपंचायत शिवनी), सौ. प्रमिलाताई परमानंद राऊत (सदस्या, ग्रामपंचायत शिवनी), टेकराज हेमणे (अध्यक्ष, तंटामुक्त समिती, शिवनी), राधेश्याम हत्तीमारे (सामाजिक कार्यकर्ता, शिवनी), तसेच संजय डोये (माजी उपसरपंच, ग्रामपंचायत शिवनी) यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला पाऊलझगडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या दळणवळण सुविधेत मोठी भर घालणारा हा रस्ता स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील विकासदृष्टीने मोलाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत शिवनी व स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रस्त्याचे दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.






