

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे त्यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण; विविध मान्यवरांची उपस्थिती
आमगाव (दि.७ जून): शिक्षण महर्षी, माजी खासदार आणि आदिवासी भागात ज्ञानाची गंगा वाहविणारे श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगावच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालय प्रांगणातील त्यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हे व्रत उराशी बाळगणारे आणि प्रलोभनांपासून दूर राहून सात्विक जीवनशैलीचा आदर्श समाजासमोर ठेवणारे, लक्ष्मणराव मानकर गुरुजी हे आदिवासी भागातील शिक्षणाचे दीपस्तंभ होते. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण ठेवत विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डी. एम. राऊत,वाचनालय अध्यक्ष सुनील पडोळे,प्राध्यापिका योगिता हलमारे,चुटे मॅडम,शिक्षिका सेमा पांडे,प्रा. बी. एल. ठाकुर,अनिल शिवनकर, ईनेश पारधी,कोलवते बाई, रोशन वर्गंटवार,दया चुटे, विजया घोडमारे आणि यशस्वी शहारे आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सामाजिक शिक्षणाचे कार्य सुरु ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.






