

तुमसर – शासनाने 2005 पूर्वीच्या जाहिरात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केलेली आहे.परंतु 2005 पूर्वी प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही.म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागातील 2005 पूर्वीच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांनी एकत्र येऊन राज्यव्यापी कृती समिती निर्माण करून जुनी पेन्शन मिळावी म्हणून लढा उभा केलेला आहे.त्याचाच एक भाग म्हणून राज्य कृती समितीच्या वतीने तुमसर-मोहाडी मतदार संघाचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांना निवेदन दिले.सदर प्रसंगी कृती समितीचे रुपेश भिगवडे,रोशन पाटील,विशाल तायडे,माधव वडनेरकर,रोशन वंजारी आदी उपस्थित होते.आ.राजूभाऊ कारेमोरे यांनी शिष्टमंडळाचे संपूर्ण म्हणने ऐकून घेतल्यावर याबाबत मी पाठपुरावा करेल. असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.






