जागतिक ‘Accreditation Day’ निमित्त उपविभागीय प्रयोगशाळा किडंगीपार येथे अभ्यासदौरा

0
240
1

पाणी गुणवत्ता तपासणी प्रक्रियेची प्रात्यक्षिक माहिती; पदाधिकारी,विविध ग्रामपंचायती व पं. स. आमगाव च्या प्रतिनिधींचा सहभाग

“पाण्याच्या गुणवत्तेसाठी सजग पाऊल!”

प्रत्यक्ष नमुना तपासणी व WQMIS ऑनलाईन प्रणालीची सखोल माहिती

आमगाव (दि. ०९ जून २०२५): जागतिक Accreditation Day च्या निमित्ताने उपविभागीय प्रयोगशाळा, किडंगीपार येथे एक विशेष अभ्यासदौरा संपन्न झाला. या अभ्यासदौऱ्यात ग्रामपंचायत प्रतिनिधी, आरोग्य सेवक, आशा सेविका, योजना दूत, समन्वयक व स्थानिक पत्रकार आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या दौऱ्यात दिनेश वाघमारे (रसायनी) आणि दीपेंद्र भावे (अनुजैविक तज्ज्ञ) यांनी उपस्थित प्रतिनिधींसमोर “पाणी हेच जीवन” या महत्वाच्या विषयाशी संबंधित रासायनिक (Chemical) व अनुजैविक (Bacteriological) प्याऱामीटर्स बाबत सविस्तर माहिती दिली.

त्यांनी प्रात्यक्षिक नमुना तपासणी (Practical Testing) करून पाणी गुणवत्ता परीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया सर्व सहभागींसमोर सादर केली. यामुळे सहभागी अधिकारी व सेवकांना प्रत्यक्ष अनुभवातून पाणी परीक्षणाची स्पष्ट समज प्राप्त झाली.

तसेच, WQMIS (Water Quality Monitoring Information System) या ऑनलाईन प्रणालीच्या वापराविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. यामध्ये नमुना नोंदणी, अहवाल व्यवस्थापन, व पाण्याच्या गुणवत्तेचे मॉनिटरिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी भेटीदरम्यान डी. बी. उके आरोग्य सेवक, पंचायत समिती आमगाव,श्रीमती ललिता कथलेवार  सदस्य, ग्रामपंचायत आसोली,श्रीमती किरण तुमसरे आशा सेविका, ग्रामपंचायत गोरठा, के. आर. मेश्राम  ग्रामपंचायत अधिकारी, तिगांव,धनराज भगत पत्रकार, आमगाव,श्रीमती अनिता पटले CRP, फुक्कीमेटा,कुमार निलेश्वर उके योजना दूत, ग्रामपंचायत मोहगाव,गांधी पटले गट समन्वयक, प्रमोद मेश्राम – समूह समन्वयक,कु. स्वाती मेश्राम – संगणक परिचालक (WASH), पंचायत समिती आमगाव आदि मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी परीक्षण प्रक्रियेबाबत सजगता, पारदर्शकता व जागरूकतेचा संदेश देण्यात आला. गावकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पाणी पुरविण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी एकत्र येऊन राबवलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला.

Previous articleस्मार्ट मीटरवर आमगावकरांचा आक्रोश !
Next articleमोबाईल परत मिळताच 60 नागरिकांच्या चेहऱ्यावर उमलले हसू!