

क्षत्रिय पोवार (पंवार ) समाज आपल्या वैशिष्टपूर्ण कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहे. पोवार समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. प्रत्येक समाजबांधवांना आपण पोवार (पंवार) असल्याचा सार्थ अभिमान आहे. समाजाचा इतिहास लिहुन तो सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्याचे काम लेखक, साहित्यक, इतिहासकार यांच्या माध्यमातून होत आहे. आणि हे गरजेचेही आहे. येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाचा इतिहास साहित्यातूनच वाचायला मिळणार आहे. विशेष म्हणजे पोवार समाजातून अनेक प्रतिभावंत नवोदित साहित्यिक, कवी, इतिहासकार पुढे आले आहेत. ते आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा अबाधित राखण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. पोवारी साहित्यातून समाजाच्या पारंपारीक चालीरीती, पोवारी बोली यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. आधुनिकीकरणात सुरवातीला अश्या बोलीभाषा, जुन्या चालीरीती जानणारा व्यक्ती हीन समजला जायचा. परंतु आता मात्र चित्र हळूहळू बदलत चालले आहे. पोवारी बोलणे किंवा पोवारी संस्कृतीचे जतन करणे याविषयी पोवार (पंवार) समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटू लागला आहे. मीसुद्धा या समाजाचा भाग आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या समाजाचा अभिमान प्रत्येकाना असायलाच हवा. मध्यभारतात आपल्या समृद्धशाली इतिहासासाठी प्रसिद्ध असलेला पोवार (पंवार ) समाज भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करेल की काय असा प्रश्न आता मला पडत चालला आहे. काही लोक मला मुर्खातही काढतील…. हो…
आज पोवार समाजातीलच काही संधीसाधू लोकांनी त्यांच्या वयक्तिक स्वार्थासाठी ‘भोयर /भोयर पवार’ या समाजाला पोवार समाजात विलीन करण्याचा विडा उचलला आहे. समाजातील जे लोक आमच्यासाठी आदर्श होते, त्यांनी वयक्तिक स्वार्थासाठी
‘भोयर /भोयर पवार’ हा समाज आपलाच आहे असा प्रचार सुरू केला..ही सांगणारी मंडळी वयाने मोठी होती.. सन्मानीय होती. म्हणून माझ्यासारखे अनेक तरुण गप्प राहिले… आणि समाज संघटनेपासून फारकत घेतली. मनात मात्र शल्य होतंच, की जे काही होतं आहे ते येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण माझ्या आजोबा पणजोबा कडून मी कधी ऐकले नाही की ‘भोयर / भोयर पवार ‘ समाजाच्या लोकांशी आमची सोयरकी झाली असेल. माझ्या पोवार समाजाच्या आचार, विचार, बोली भाषा, रूढी परंपरेला स्वतंत्र अस्तिव आणि ओळख आहे. ‘त्या’ लोकांचा इतिहास, बोली भाषा, रूढी परंपरा वेगळ्या आहेत. निश्चितच त्यांचा समाजही प्रगत असेल. मला कोणावर टीका टिपन्नी करायची नाही. पण मला वाटते 36 कुलीन पोवार (पंवार) समाजाचा गौरवशाली इतिहास असताना ‘भोयर/ भोयर पवार’ समाजाला आपलेच म्हणून ‘खबराकरण’ करण्याची गरजच काय? ठीक आहे एखाद्याला त्यांचे आचार विचार पटत असतील किंवा सोयरकी झाली असेल परंतु त्याचा संपूर्ण समाजाने स्वीकार करावा आणि त्यासाठी आपल्याच समाजातील काही व्यक्तींनी जीवाचा आटापिटा करावा हे कितपत योग्य आहे?
मला याद्वारे हेच सांगायचं आहे की मुठभर काही धनाढ्य व्यक्तींनी समाजाला वेठीस धरू नये. ‘त्या’ लोकांना तुम्ही नक्कीच सन्मान द्या, सोयरेकी करा, त्यांच्याशी चांगले व्यवहार ठेवा परंतु पोवार समाजाच्या अस्तित्वाला ठेच पोहोचेल असे काही कृत्य करू नका. काही लोकांना माझा मूर्खपणा वाटत असेल तर त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी की ‘भोयर/भोयर पवार’ आपले कसे ?
आजही ग्रामीण भागामध्ये ‘भोयर/ भोयर पवार’ आपलेच आहेत ही गोस्ट मान्य नाही. पोवार (पंवार) समाजाचे अस्तिव वेगळे आहे. आणि हे अस्तित्व टिकवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या समाज बांधवांना होणाऱ्या खबराकरनाविषयी जागृत करणे आवश्यक आहे. माझी जरी सुरुवात छोटी असली तरी पोवार (पंवार) समाजाच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी निर्णयक ठरेल असे मला वाटते.
✍✍✍✍✍✍✍सुनिल तूरकर. 9579615335






