

प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला आरोग्यमय जीवनाचा संकल्प – प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी
आमगाव,(21 जून) : आज दिनांक 21 जून 2025 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिरचाळबांध येथे जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामूहिकरित्या योगासने आणि प्राणायाम करून शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती, आमगावचे माजी सभापती राजेंद्र गौतम, ग्रामपंचायत सरपंच तसेच उपसरपंच सुधीर पटले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केवलराम भाजीपाले आणि सदस्य दिलीप राऊत मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेतृत्व मुख्याध्यापक निळकंठ बिसेन सर यांनी केले. यावेळी शिवकुमार वाकले सर, वैद्य सर, वामन किरमोरे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिक देत त्याचे महत्त्व विशद करण्यात आले. नियमित योगाभ्यास केल्यास तणावमुक्त व निरोगी जीवन शक्य आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देण्याचा संकल्प केला.


