

गोंदिया : मुव्हमेंट 21 गोंदिया तथा सेवानिवृत्त कर्मचारी खापर्डे कॉलनी गोंदिया यांनी जिल्हा परिषद शाळा मुंडीपार (एमआयडीसी), शेजगाव, गात्रा, येथील वर्ग पाच ते सातच्या एकूण 200 विद्यार्थ्यांना शाळेची बॅग्ज, पाच नोट बुक, पेन,पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाणी बॉटल या शैक्षणिक साहित्याचे वाटप केलें.

खापर्डे कॉलनी येथील सेवानिवृत्त कर्मचारी यांनी तीन वर्ष आधी गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे संकल्पना मुव्हमेंट 21 गोंदिया कार्यकर्त्यां समोर ठेवली. मुव्हमेंट 21 गोंदिया यांनी सुद्धा हे सामाजिक दायित्व समजून या उपक्रमात सहभागी होण्याचे ठरवले. त्यानुसार प्रत्येक वर्षाला 100 विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे लक्ष ठेवून जिल्हा परिषद शाळांना वाटप करण्यात आले होते. परंतु वर्ष 2025 या वर्षी 200 विद्यार्थ्यांचे लक्ष ठेवण्यात आले व त्यानुसार जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे गरीब व होतकरू मुलं यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व सर्व खेड्यापाड्यातील मुलगा शिकावा या उद्देशाने हा उपक्रम मुव्हमेंट 21 गोंदिया तसा सेवानिवृत्त कर्मचारी खापर्डे कॉलनी गोंदिया यांचा मानस होता त्या उद्देशाने दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हे राबवत आहे. या उपक्रमामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपैकी प्रा. सिद्धार्थ रामटेके, श्री अशोक रामटेके, श्री सदानंद पानतावणे, श्री राऊत, श्री प्रकाश इलमकार, श्री डी.एम. वासनिक, श्री डोंगरे, श्री मानकर, श्री अरुण मेश्राम श्री नरेंद्र जवरे, श्री मनोज राऊत, श्री वेगड सर इ. सहभाग घेतला. तर मुव्हमेंट 21 तर्फ डॉ. चिंतामण टेंभुर्णे, प्रा उमेश उदापुरे, डॉ. सुनील जाधव, एड. एकता गणवीर, काव्या गणवीर, प्रा. शशिकांत कडू, प्रा. परिमल डोंगरे, प्रा. किशोर वासनिक, प्रा.योगेश भोयर, प्रा. रमेश धुर्वे, प्रा. रितू तुरकर, प्रा. यात्रिक भगत प्रा.शामकुवर, श्री शिशिर डोंगरे, श्री रोहन रंगारी, एड. सांगोळे, श्री सुशील वनकर, श्री विजयकर, श्री वानखडे त्यांनी सहभाग घेतला.






