पोलिसांची मोठी कारवाई: बामणी हद्दीतून अवैधरित्या साठवलेला विदेशी दारूचा साठा जप्त..

0
704
1

गडचिरोली: पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. दिनांक २७/०९/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेने उपपोस्टे बामणी हद्दीतील जाफराबाद, ता. सिरोंचा येथे धाड टाकून १४ लाख ४७ हजार ६८० रुपये किमतीचा अवैध विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद येथील संदीप देवाजी दुर्गम याने आपल्या घरी विक्रीकरिता हा विदेशी दारूचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच आरोपी संदीप दुर्गम याने घटनास्थळावरून पळ काढला.

​पोलिसांनी घराची झडती घेतली असता, दुसऱ्या खोलीमध्ये ऑफिसर चॉईस कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या ११,१३६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. अवैध विक्री किंमत अंदाजे १३० रुपये प्रति बाटलीनुसार, या संपूर्ण साठ्याची किंमत १४,४७,६८०/- रुपये इतकी आहे.

​हा सर्व मद्यसाठा पोलिसांनी पंचनाम्याद्वारे जप्त केला आहे. याप्रकरणी उपपोस्टे बामणी येथे आरोपी संदीप देवाजी दुर्गम (रा. जाफराबाद, ता. सिरोंचा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. शाहू दंडे हे करत आहेत.

​सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान),एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा/प्रेमानंद नंदेश्वर, पोअं/निशिकांत अलोने आणि चापोअं/गणेश वाकडोपवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Previous articleसंस्कृति, परम्परा और कौशल का संगम: श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल में दो दिवसीय ‘गरबा महोत्सव’
Next articleमहसूलसेवकांचा संप सुरूच; सेवा पंधरवड्यावर परिणाम