भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

0
98
1

भंडारा : आज व्ही.के. हॉटेल, गांधी चौक भंडारा येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार  प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भंडारा शहरातील जनतेच्या अडचणी, स्थानिक प्रश्न व विकासकामांबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने व विजय मिळवून देणारे उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या मार्गदर्शन करतांना आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने काम करून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. पक्षाच्या धोरणांबरोबरच स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केल्यास जनता आपल्याला पाठिंबा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीला खासदार  प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, विनय मोहन पशिने,महेंद्र गडकरी, परवेज पटेल, यशवंत सोनकुसरे, रवींद्र वानखेडे, नरेंद्र झंझाड, सरिता मदनकर, हेमंत महाकाळकर, मंजुषा बुरडे, राजू हेडाऊ, विजू खेडीकर, जगदीश निंबार्ते, रुपेश खंगले, संजय बोदरे, शेखर गभने, आशिष दलाल, प्रशांत देशकर, रजनीश बन्सोड, नागेश भगत, अशोक सांडेकर, आरजू मेश्राम, लोकेश नागरे, हितेश सेलोकर, सुनील साखरकर, नेहा शेंडे, अमिश वासनिक, अमान मेश्राम, लक्ष्मीकांत गभने, प्रभाकर बोदेले, रत्नमाला चेटुले, नरेश इल्मकर, राजू पटेल, सोनू खोब्रागडे, महेंद्र वाहणे, राहून निर्वाण, उमेश ठाकरे, अमर उजवणे, संजय वरगंटीवार, प्रदीप सतदेवे, मनोहर गणवीर, किरि गणवीर , अनिता महाजन, गणेश चौधरी, श्रेष्ठ मेहर, प्रतीक थानथराते, इंदू येरकडे, नारायणसिंग राजपूत, अरुण अंबादे, राहून वाघमारे, जुगल भोंगाडे, अंबादास मंदुरकर, विवेक मेश्राम, जवाहर निर्वाण, सोनू कनोजे, संजय सतदेवे, बल्लीभाई सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

बैठकी दरम्यान खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासवादी धोरणांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून भंडारा येथील सर्वश्री अरुण भेदे, जगदीश उके, दिवाकर बोरकर, एकनाथ लांजेवार, नंदलाल लाहौरिया, सुजीत बोरकर, योगेश बोरकर, विनोद वघारे, जितेंद्र श्रीपात्रे, अनिकेत बोरकर, दिनेश आगरे, ऋचा आगरे, प्रकाश मानपुरे, गणेश येरने, नितिन शेन्द्रे, पंकज लिमये, दिनेश भूते, देवराम गिरिपुंजे, रमेश कुम्भलकर, सुनील निनावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रफुल  पटेल त्यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून प्रवेश केला

Previous articleशहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – खासदार प्रफुल पटेल
Next articleमाँ के चरणों में सौ.वर्षाताई पटेल ने नमन कर की सुख-शांति समृद्धि की प्रार्थना