

शेकडो कार्यकर्त्यांचा खा.श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत प्रवेश
तुमसर : शकुंतला सभागृह, तुमसर येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान आगामी नगर परिषद निवडणुकीच्या संबंधाने कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना खासदार प्रफुल पटेल यांनी मार्गदर्शन केले.




पुढे बोलतांना ते म्हणाले कि, कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करून बूथ मजबूत करावे तरच आपला पक्ष मजबूत होईल. कार्यकर्ता मजबूत करण्याचे काम आम्ही करतो परंतु त्यांनी पक्षाला वेळ देण्याचे काम करावे तर निश्चितच पक्ष मजबूत होईल. पक्षात अनेकांना चांगल्या संधी आहेत त्याचे सोने करण्याचे काम कार्यकत्यांनी करावे. या भागाच्या शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगती साठी बावनथडी प्रकल्प व लघु प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीला सिंचन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस – भाव देण्याचे काम आम्ही केले आहे. पुढे विकासाची कामे करीत राहणार आहोत. तुमसर व परिसरातील भागाचा विकासासाठी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण आपसातील मतभेद बाजूला सारून एकसंघ पणे काम करायचे आहे. स्थानिक सत्ता हातात असल्यास कार्यकर्त्यांचे लहान मोठी कामे मार्गी लागतात व विकासाची कामे साध्य करता येतात त्यामुळे नगर परिषदेत विजयी मिळवण्याचे काम आपण करावे विकासाची ग्वाही मी आपल्याला देता असे आश्वासन श्री प्रफुल पटेल यांनी दिले.
तुमसर तालुक्यातील माजी सभापती नंदू रहांगडाले यांनी मागील काही दिवसांपूर्वी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आज तुमसर येथे त्यांच्या शेकडो समर्थकांनी खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी सर्वश्री प्रफुल पटेल, राजुभाऊ कारेमोरे, नानाभाऊ पंचबुधे, धनंजय दलाल, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, नंदू राहंगडाले, विठ्ठल कहालकर, नरेश ईश्वरकर, अनिता नलगोकुलवार, दीपिका गौपाले, राजेश देशमुख, रेखा ठाकरे, रितेश वासनिक, राजू माटे, रामदयाल पारधी, महादेव पचघरे, मनोज झुरमुरे, योगेश सिनगंजूड़े, यासीन छवारे, सरोज भूरे, रेखा ठाकरे, पमा ठाकुर, सुनील थोटे, सलाम तुरक, विक्रम लांजेवार, जयश्री गभने, सागर गभने, सुरेश रहांगडाले, गुलराज कुंदवाणी, प्रदीप भरणेकर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.






