

‘जय जवान, जय किसान’ आणि सत्य-अहिंसेच्या मूल्यांचे स्मरण; महाविद्यालयात साधेपणाने पार पडला कार्यक्रम
आमगाव ( २ ऑक्टोबर) : भारताच्या इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्त्वे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, यांच्या जयंतीनिमित्त आज श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मूल्यांचा आदर्श तसेच शास्त्रीजींचे साधे जीवन, सचोटी आणि ‘जय जवान जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर आणि अन्य प्राध्यापकांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. गांधीजींचे जीवन हे सामाजिक समतेसाठी आजही एक जिवंत प्रेरणास्रोत आहे, याचे यावेळी स्मरण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. जितेंद्र शिवणकर, प्रा. देवेंद्र बोरकर, आणि प्रा. महेंद्र तिवारी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक गण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधेपणाने पार पडलेल्या या कार्यक्रमात दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा उपस्थित सर्वांना देण्यात आली.
महाविद्यालयाने या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची आणि साधेपणाची भावना रुजवली.






