गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा! दिव्या भोजवानीला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक

0
60
1

आंध्र प्रदेशातील स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळवून देण्यात आमगावच्या दिव्याचा महत्त्वाचा वाटा
आमगाव : योगासन भारत, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, युवक आणि क्रीडा मंत्रालय तसेच फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्र प्रदेशातील पीबी सिद्धार्थ आर्ट आणि सायन्स कॉलेज, विजयवाडा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना गोंदिया जिल्ह्याच्या श्रीमती दिव्या भोजवानी यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दिव्या भोजवानी यांनी ‘सुपायन’ या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करून गोंदिया जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
२८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत चाललेल्या या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उपविजेतेपद मिळवले, ज्यात दिव्या भोजवानी यांच्या सुवर्णपदकाचा मोठा वाटा आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा आंध्र प्रदेशचे मंत्री कोल्लू रवींद्र, खासदार केसीनेणी सिवानाथ, योगासन भारतचे अध्यक्ष उदित सेठ, जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयदीप आर्य आणि अन्य अतिथींच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
गोंदिया जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडू असलेल्या दिव्या भोजवानी यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशातून जिल्ह्यातील इतर खेळाडूंनाही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीमती दिव्या भोजवानी यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल गोंदिया जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी आणि खेळाडूंकडून त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात आले आहे. अभिनंदन करणाऱ्यांमध्ये जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोसरकर, उपाध्यक्ष दादा फुंडे, सचिव विनायक अंजनकर, तसेच शशांक कोसरकर, लक्ष्मण चव्हाण, आनंद मकवाना, रविशंकर नागपुरे, प्रिया राणे, चेतना नागपूरे, सुमती डोलारे, वैभव परतेकी, दिपाली कठाणे, सरिता दमाहे, मुकुल अग्रवाल, सीमा नागपुरे, बरखा नेचवानी, अर्चना मारबते, माधुरी वनवे, अनिरुद्ध कनोजे, रोहित धार्मिक, रंजना ब्राह्मणकर आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी व खेळाडूंचा समावेश आहे.
दिव्या भोजवानी यांच्या या यशाने गोंदिया जिल्ह्यात योगासन खेळाला नवी ऊर्जा मिळाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या सुवर्णपदकामुळे गोंदिया जिल्ह्याची ओळख ‘योगनगरी’ म्हणून अधिक दृढ झाली आहे.