

आमगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी विचार मंचच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महात्मा गांधी विचार मंचचे समन्वयक पंडित शंभू प्रसाद अग्रिका यांनी भूषवले.
जयंती कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे सचिव इसूलाल भालेकर, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी संपतलाल सोनी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय बाहेकर, तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष राधेलाल रहांगडाले, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छबुताई उके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देव कांत बाहेकर, सेवादलाचे यादवराव भोयर, किसान कांग्रेस चे गणेश हुकरे, रामेश्वर शामकर, महेश उके, प्रशांत गायधने, रितेश चुटे, जगदीश चुटे, मुकेश (भास्या ) अग्रवाल, केशोराव निखारे, नरेंद्र बोहरा, उपासराव शेंडे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन इसूलाल भालेकर यांनी केले तर आभार रितेश चुटे यांनी व्यक्त केले.






