

पुणे येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ४५ किलो वजनी गटात पटकावले द्वितीय स्थान; शाळेसाठी गौरवास्पद यश!
आमगाव : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा युवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘वुशू’ स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, आमगाव येथील विद्यार्थिनी कुमारी रिया पूर्णानंद ढेकवार हिने लक्षवेधी कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
रियाने आपल्या वयोगटातील विविध विभागातील प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या कौशल्याने पराभूत करत मुलींच्या १७ वर्षांखालील गटात ४५ किलो वजन गटात द्वितीय (दुसरे) स्थान पटकावले.
रियाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्मृती छपरिया मॅडम, तसेच शाळेचे संचालक डॉ. विकास जैन, डॉ. लता जैन, डॉ. ललित कलंत्री, डॉ. जितेंद्र वाळके, डॉ. भाग्यश्री वाळके, लीलाधर कलंत्री, राजेश गोयल यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग आणि कर्मचारीवर्गाने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या दैदिप्यमान यशाचे श्रेय रियाने शाळेच्या प्राचार्या श्रीमती स्मृती छपरिया, तसेच क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम घाटोले, श्रीमती वंदना रंगारी, श्रीमती मालती लिल्हारे आणि आपल्या माता-पित्यांना दिले.
कुमारी रिया ढेकवार हिने केलेली ही कामगिरी शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली असून, ती इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

