रेपनपल्लीत ‘नशेच्या सौदागरांना’ नाकाबंदीत अटक; १ किलो गांजा जप्त, तपास सुरू

0
337
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
1

रेपनपल्ली/गडचिरोली: शांतता आणि सुरक्षिततेच्या मार्गावर गस्त घालत असलेल्या गडचिरोली पोलिसांनी रेपनपल्ली (Repanpalli) येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत हुशारीने कारवाई करत नशेच्या काळ्या धंद्याला मोठा हादरा दिला. जिमलगट्टा उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्ली पोलीस स्टेशनजवळ सुरू असलेल्या नाकाबंदीत हा ‘नशेचा साठा’ उघडकीस आला.

पोलिसांनी तपासणीसाठी एक दुचाकी थांबवली असता, पाठीमागे बसलेल्या इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याने दोन्ही पायांमध्ये अत्यंत चातुर्याने एक पिशवी लपवल्याचा संशय कर्तव्यदक्ष पोलिसांना आला आणि त्यांनी तात्काळ पिशवीची पाहणी केली. पोलिसांचा संशय खरा ठरला आणि त्या पिशवीत तब्बल १ किलो १०८ ग्रॅम (एक किलो एकशे आठ ग्रॅम) गांजा आढळून आला.

हे दोन्ही आरोपी शेजारील तेलंगणा राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईनंतर, रेपनपल्ली उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने एनडीपीएस कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंदवला आणि दोन्ही आरोपींना अटक करून कायद्याच्या बेड्या ठोकल्या.

निलोत्पल साहेब (पोलीस अधीक्षक, गडचिरोली), अपर पोलीस अधीक्षक अहेरी, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा आणि स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील कसून तपास पोलीस उप निरीक्षक अतुल तराळे करत असून, यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान गडचिरोली पोलिसांसमोर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सीमाभागातून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांची ही सतर्कता अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे.

Previous articleगडचिरोली जिल्हा परिषद सदस्यपदाच्या ५१ जागांचे आरक्षण निश्चित..
Next article10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर