तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

0
74
1

तिरोडा : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज तिरोडा येथील कुंभारे लॉन येथे तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीदरम्यान निवडणुकीसाठीची रणनिती, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी निवडणूक प्रक्रियेतील विविध नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, डॉ अविनाश जैस्वाल, नरेश कुंभारे, रामकुमार असाटी, राजेश गुनेरिया, सलीम जावेरी, ममता बैस, प्रभू असाटी, आनंद बैस, भाजू धामेचा, नागेश तरारे, मनोहर तरारे, अमित बराई, मधू तरारे, प्रशांत डहाटे, जग्गू कटरे, मुकेश बेलानी, विजय बुरडे, रश्मी बुराडे, विजय बनसोड, डॉ संदीप मेश्राम, राऊळकर मॅडम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.