

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नागरिक सेलची एक महत्त्वपूर्ण बैठक आज गोंदिया येथील केमिस्ट भवन येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी गोंदिया शहराच्या विकासावर आणि आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.
जेष्ठ नागरिक समाजाचे आधारस्तंभ: राजेंद्र जैन
बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना राजेंद्र जैन यांनी जेष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून, समाज त्यांच्याकडे आदराने व सन्मानाने पाहतो, असे गौरवोद्गार काढले. गोंदिया शहराच्या विकासात ज्येष्ठ नागरिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याची त्यांना निश्चित जाणीव आहे.
जैन यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत गोंदिया शहराच्या विकासासाठी आपले विचार मतदारांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शहरातील समस्यांचे निराकरण कोण करू शकते, याची जाणीव नागरिकांना करून द्यावी.
खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा आढावा: राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रातील झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्थानिक पातळीवर विविध विकास कामे, रेल्वे स्टेशनचा कायापालट, अनेक द्रुतगती रेल्वेचे थांबे आणि बिरसी विमानतळावरून उड्डाण सुरू झाल्याचा समावेश आहे. या विकासकामांमुळे या भागांच्या व्यापार, शिक्षण, अत्यावश्यक आवागमन आणि एकूणच विकासात भर पडत आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपरिषदेची सत्ता दिल्यास, खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया शहरातील रस्ते, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा अनेक प्रलंबित समस्यांचे निश्चितपणे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
या बैठकीला सर्वश्री राजेन्द्र जैन, हुकुमचंद अग्रवाल, देवेन्द्रनाथ चौबे, अशोक सहारे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, केतन तुरकर, मनोहर वालदे, भगत ठकरानी, उमेन्द्र भेलावे, तिलक लारोकर, झलक बिसेन, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान, सतीश देशमुख,सी बी बिसेन, लाडे सर, ढोमणे सर, विनोद पंधरे, गुड्डू बिसेन, छोटू पंचबुधे, पटले सर, चंदुलाल हनवते, हरगोविंद चौरसिया, आलोक द्विवेदी, मृत्युंजय सिंग, भागीरथ जीवनी, भूषण फुंडे, टीकाराम गायधने, रमेश श्रीवास्तव, नीलकंठ भेंडारकार, जयंत कछवाह, प्रवीण बैस, राहुल वालदे, बी ए राउत, बी टी पटले, योगेन्द्र जैतवार, अन एस बघेले, एम के राहंगडाले, राजू भगत, मनीष कापसे, अशोक बोरकर, वीरेंद्र सिनगंजूड़े, बेनीप्रसाद यादव, जितेंद्र गलोले, डालेश्वर बिसेन, लतीफ शेख, सुरेश रोटकर, योगेश दरवे, नईम खान, भागवत डिब्बे, अमित अवस्थी, सचिन अग्रवाल, मनोज काले, विनायक चौहान, राजेंद्र कपूर, शिवेंद्र ऐड़े, रामकुमार श्रीवास्तव, योगेश व्यास,अशोक यादव, त्रिलोक तुरकर, पंकज चौधरी, नितेश अग्रवाल, अभय अग्रवाल, मनोज अग्रवाल, मदन उपाध्याय, धीरज उपाध्याय, बाबा रॉय, बंटी ठाकुर, लोकेश भोयर, बेनीराम निपाने, संजय जैस्वाल, आर आर बिसेन, के पी चित्रिव, हेमंत जैस्वाल, आर रामटेककर, पंढरी जी, नरेंद्र भुजाडे, सुनील भजे, निपाने टेलर, नफीस सिद्धकी, एस तुरकर, डी आर चौरगडे, हरिश्चंद्र पंचबुद्धे, गेंदलाल तुरकर,करसियालजी, सुखनंदन तुरकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






