भ्रष्ट यंत्रणेचे संगनमत; मेलेला उंदीर गरीबांच्या ताटात  गरीबांच्या हक्काचे अन्न ओरबडतेय भ्रष्ट यंत्रणा

0
785
1

विलास चाकाटे

देवरी, दि. १७

गोरगरीब विद्यार्थी या खाऊसाठी मोठ्या आवडीने अंगणवाडीला हजेरी लावतात. मात्र, याच गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आज (दि.१७) ला देवरी तालुक्यात दिसून आला आहे. लहान मुलांच्या पोषण आहार पाकिटात मेलेला उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेने पालकवर्गात घबराट पसरली आहे.

 

देवरी तालुक्यातील धवलखेडी येथे लहान मुलांच्या पोषण आहारातील पाकिटात मेलेला उंदीर आढळल्याची घटना घडली. लाभार्थ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. धवलखेडी येथील अंगणवाडीत लहान मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर सापडला. या घटनेने परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या अंगणवाडीतून 6 महिने ते 3 वर्षे वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीन्सची पाकिटे पुरवली जातात. घरी गेल्यानंतर लाभार्थ्यांनी पाकीट उघडून बघितल्यावर ही बाब आल्याने मोठा प्रसंग टळला. मात्र या घटनेने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंगणवाड्या मध्ये वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे. या प्रकारामुळे महिला बालविकास विभागाचे सभापती या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करणार काय? याकडे सर्व तालुका वासियाचे‌ लक्ष लागले आहे. धवलखेडी अंगणवाडीतील प्रकारावर काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल.

अधिकारी नॉट रिचेबल?

धवलखेडी येथील अंगणवाडी येथील पोषण आहारात खडलेल्या प्रकाराबद्दल मोबाईल वर संपर्क साधला मात्र अधिकारी नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले.