

साकोली–सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज साकोली येथील संत लहरीबाबा मठ देवस्थान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेंद्र जैन व सुनीलभाऊ फुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत आगामी निवडणुकीसाठीची रणनिती, प्रचाराची दिशा आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्यांवर पक्ष सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरणार असून येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन जनसंपर्क वाढवावा, नागरिकांशी संवाद साधावा आणि निवडणुकीत चांगले उमेदवार उभे करा आणि त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांनी सर्व इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज लवकर पक्ष कार्यालयात जमा करावेत, तसेच प्रत्येक उमेदवाराचा सर्वेक्षण करून पात्र उमेदवारांना पक्षाचे तिकीट देण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान परतीच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी. तसेच कमी कालावधीच्या धानाची मळणी झाली असून शासकीय आधारभूत केंद्र सुरु न झाल्यामुळे कमी भावात शेतकऱ्यांना धान विकावा लागत आहे त्यामुळे केंद्रे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार साकोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले .
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, सुनिल फुंडे , अंगराज समरीत, सुरेशसिंह बघेल, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे,डॉ राजेश चांदवणी, शैलेश गजभिये, प्रवीण भांडारकर, निलेश घरडे, एड.धर्मेंद्र अग्रवाल, योगराज रहिमतकर, रविभाऊ माकोडे, सोनूभाऊ राऊत, निखिल जिभकाटे, भोलाराम राऊत, नरेंद्र साखरे, बालू कापगते, महेश राऊत, चंदू सारंगपुरे, रवींद्र राऊत, खुशाल फुंडे, राजूभाऊ मेंढे, लाला उपाध्याय, भास्कर शहारे, गौतम चांदेवार योगराज कागगते, नंदलाल कापगते, गुलाबभाऊ कापगते, भोजेन्द्र गहाणे, हेमराज मुंगुलमारे, युवराज कापगते, रामकृष्ण लांजेवार, विलास शेंडे, गंगाराम कापगते, अरुण राऊत, पृथ्वीराज बनसोड, महेश रामटेके, अनुरागजी हुमणे, राकेश भास्कर, राजूभाऊ हटवार, धनंजय शहारे, विशाल मेश्राम, विजुभाऊ कापगते सौ.जयाताई भुरे, सौ.प्रीतीताई भांडारकर, भुमालाताई कुंभरे, कौशल्याताई नंदेश्वर, लताताई परसगडे, शीलादेवी वासनिक, लताताई दूरगकर, ललिताताई गभने, सविताताई शहारे, जयश्रीताई राकेश भास्कर, महाराणीताई शेंडे, हिनाताई वलके, दिपालीताई रामटेके, मायाताई रंगारी, सुरेखाताई शहारे, रेशमाताई चांदेवार, ज्योतीताई कानेकर, लताताई खंडाईत, नूतनताई राऊत, रंजनाताई गोडसे, सुनंदाताई रंगारी, दुर्गाताई नंदेश्वर, प्रीतीताई राऊत, सपनाताई राऊत, मालनताई शामकुवर, मंगलाताई गौपाले सह पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.






