

गोंदिया : शहराचा सर्वांगिन विकास करुन शहरवासीयांना दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात विविध विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबध्द राहिल. शहरात विविध विकास कामे करुन कायापालट करण्यास आमचे नेहमीच पहिले प्राधान्य राहिले आहे. पण शहरवासीयांचा विश्वास आणि सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे गोंदिया शहराचा सर्वांगिन विकास करण्यासाठी शहरावासीयांनी सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.
गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची प्रभाग क्रमांक ८,९,१०,११ व १८,१९,२०,२१,२२ मधील इच्छुक उमेदवार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शिवनाथजी की मळी, माता टोली, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.
बैठकीला सर्वश्री राजेन्द्र जैन, लक्ष्मीचंद रोचवानी, देवेन्द्रनाथ चौबे, नानु मुदलियार, माधुरी नासरे, शिव शर्मा, मनोहर वालदे, दिनेश अग्रवाल, केतन तुरकर, लवली होरा, रवि मुन्दडा, कल्लू यादव, दिलीप गोपलानी, विनीत सहारे, विष्णु शर्मा, अरुण गजभिये, अनुज जैस्वाल, अनिल ककवानी, निर्मला मिश्रा, कुन्दा दोनोडे, संगीता माटे, ज्योत्स्ना सहारे, आरधना माटे, कस्तूरा माटे, सोनू चिमोटे, टीना मानकर, संध्या गगभोज, अनिता मेश्राम, सरजारेजी, ज्योति जनवारे, जुली दिप, ममता कुमार, करण टेकाम, योगेश दरवे, पंकज मिश्रा, शरद अग्रवाल, बंटी चौबे, सौरभ जैस्वाल, शारूख पठान, अमित भालेराव, श्याम चौरे, बिट्टू सोनपुरे, मनोज जोशी, आनंद ठाकुर, बंटी डोंगरे, पलाश लालवानी, लव माटे, सुनील पटले, कान्हा यादव, दिलप्रीत होरा, करण गिल, शैलेश वासनिक, रौनक ठाकुर, हर्षवर्धन मेश्राम, विककी भाकरे, शरभ मिश्रा, विजय खोटेले, प्रणय ठाकरे, निशांत दिप, प्रणय बागड़े, राहुल वंजारी, हिमांशु दुबे, संजय मानकर, किसन दिप, सौरभ गायधने, मनोज रिपुरकर, छोटू मेश्राम, सनी चौरे, नरेंद्र बेलगे, भेलावे,राजेश टेम्भूर्णिकर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.






