म्हशींना ‘लाळ्या खुरकूत’ लसीकरण: मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रामाटोला येथे जनजागृतीपर प्रात्यक्षिक

0
135
1

आमगाव: मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला येथील कृषी विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्य अनुभव आणि औद्योगिक संलग्नता’ या उपक्रमांतर्गत आमगाव जवळील रामाटोला गावात महत्त्वाकांक्षी प्रात्यक्षिक सादर केले.

पशुधन आणि प्राणी शास्त्र विज्ञान विषयाचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी म्हशींसाठी अत्यंत आवश्यक असणारे ‘तोंडखुरी-पायखुरी’ म्हणजेच एफएमडी रोगावरील प्रतिबंधात्मक लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एफएमडी (लाळ्या खुरकूत) हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग असून, दुग्धोत्पादन आणि जनावरांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.
प्रात्यक्षिक सादर करणारे विद्यार्थी कामेश बोपचे, अंकुश दमाहे,समीर बोरकर,हितेश्वर हटवार या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरित्या म्हशींना लसीकरण देऊन शेतकरी बांधवांना या लसीकरणाचे महत्त्व, करण्याची योग्य वेळ आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिकाला गावातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ प्रणय फुंडे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना मोलाची ठरली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. अवताडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. सी. भगत, कार्यक्रम अधिकारी तसेच विषय शिक्षक एस. एस. पुरी, आणि एस. पी. उराडे यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी शिक्षणाचे व्यावहारिक ज्ञान पोहोचवणारा हा उपक्रम स्तुत्य असून, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे पशुधनाचे आरोग्य राखण्यास मदत मिळणार आहे.

Previous articleअखिल भारतीय साहित्य परिषदेच्या लोकसाहित्य केंद्रीय समितीवर ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड
Next articleआमगाव पोलिसांकडून जप्त वाहनांचा ‘खुल्या बाजारात’ लिलाव!