

आमगांव : श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल रिसामा येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील शिक्षिका वंदना गजभिये यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी एकांकिका सादर करून संविधान दिवसाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या भूमिका, संवाद आणि सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला.
या कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंदांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.तसेच प्राचार्या स्मृती छपरिया मॅम नी भारतीय संविधानाचे उद्दिष्ट, मूल्ये व तत्त्वांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी संविधानाची प्रस्तावना सामूहिकरित्या वाचून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुलभूत तत्वांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
अशा प्रकारे संविधान दिवसाचा कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि राष्ट्रभावनेने परिपूर्ण अशा वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.






