

प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटामाटात भव्य उद्घाटन संपन्न
देवरी : आदिवासी विकास विभागातील देवरी प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील क्रीडा स्पर्धांचे थाटामाटात उद्घाटन काल दिनांक २७ नोव्हेंबर ला एकलव्य रेशिडेंशियल शाळा बोरगाव बाजार येथे करण्यात आले,याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी सांगितले की खेळ मजा म्हणून खेळायला नको तर कॅरियर करण्यासाठी खेळा तसेच खेळात सातत्य,आत्मविश्वास, प्रामाणिकपणा,सचोटी व कठीण परिस्थितीतून कशाप्रकारे आपल्याला स्पर्धा जिंकायची आहे यासाठी स्वतःला तयार करा तरच आपण जीवनात ध्येय प्राप्त करु असे आवाहन केले, त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले की स्पोर्ट कोठ्यातून नौकरी मिळते, १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळतात त्याचा उपयोग त्यांना शैक्षणिक बाबींसाठी होत असतो त्यासाठी समर्पित भावनेने सातत्याने खेळा आणि खेळा बरोबर अभ्यासात नियमीतता ठेवल्यास जिवनात नक्कीच यशस्वी व्हाल असे सांगून, प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांविषयी माहिती दिली त्यात बांबू आर्ट, गोंडी पेंटिंग व विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने इतर कलागुणांचे विशेष प्रशिक्षण सुरू असून विद्यार्थी तयार केले जात आहेत व नुकत्याच नागपूर येथे बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने झालेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बांबू आर्ट व गोंडी पेंटिंग च्या माध्यमातून खरी कमाई म्हणून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमावले असल्याचे सांगून,ही अत्यंत आनंदाची व गर्वाची बाब असून भविष्यामध्ये आमचे आदिवासी विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होऊन आपल्या जीवनात यशस्वी होतील त्याचप्रमाणे अनेक खेळांचे कॅम्प आश्रम शाळांमध्ये सुरू असून त्यात विविध खेळ तसेच कला कौशल्यांना वाव देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे पुराडा येथे बुद्धिबळ,बोरगाव बाजार येथे जेईई,नीट,बांबू आर्ट,गोंडी पेंटिंग व इतर प्रशिक्षण त्याचप्रमाणे कोयलारी,शेंडा, पालांदूर अशा विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयंभू होण्याच्या दृष्टीने अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगून भविष्यात आमच्या प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थी एशियन गेम व ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतील अशी तयारी सुरू असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आल्यास बक्षीस दिले जाईल असेही आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले.
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या हस्ते झाल्यानंतर क्रीडा ध्वज फडकविण्यात आला,विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली त्यानंतर पथसंंचलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी अत्यंत मनमोहक असे योगाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके आश्रम शाळा बोरगाव च्या मुलींनी सादर केले, तसेच पालांदूरच्या विद्यार्थ्यांनी श्री प्रेमलाल कोरंडे सर यांच्या नेतृत्वात लेझीम नृत्यावर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे गीत श्री गणेशा देवा, बेटी हिंदुस्तान की,ए वतन,मै वापस आऊंगा अशा रिमिक्स गीतावर लेझीम द्वारे नृत्याने उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला.
उद्घाटन प्रसंगी नागपूर येथे खरी कमाई च्या माध्यमातून बांबू आर्ट व गोंडी पेंटिंगचे स्टाॅल लावणार्या विद्यार्थयांचे प्रकल्प कार्यातर्फे सत्कार करून बक्षीस देण्यात आले.प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ४८५ मुले व ४६० मुली असे एकूण ९४५ खेळाडू तसेच १८९ कर्मचारी स्पर्धेसाठी सहभागी झाले.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी सभापती अंबिकाताई बंजार यांनी आदिवासी विद्यार्थी कुठेही कमी पडत नसल्याचे लक्षातसांगितले त्याचप्रमाणे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच आदिवासींचे जात वैधता प्रमाणपत्र विषयी संशोधन अधिकारी जात पडताळणी किशोर देशकर यांनी सुद्धा यावेळी माहिती दिली.
कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी डॉ.सायली चिखलीकर, सुनील भुसारी,टीटी बघाडे,एन एम पाळेकर तसेच कपिल शर्मा, प्राचार्य तोरकड, कमल कापसे,पुरुषोत्तम भोयर, राजेश मासरकर,भुरे,मोटघरे,रवी चांगले, अशोक इस्कापे, खेडकर,गोटमवार, सहाय्यक.ले.अ.निलेश राठोड, संजय जाळे,पुनाराम मडावी व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर भिवगडे तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी सुनील भुसारी यांनी मानले यावेळी संपूर्ण क्रीडा शिक्षक,क्रीडा समन्वयक व फार मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी तसेच पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व इतर मंडळी उपस्थित होते.






