

20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला मतमोजणी; प्रभाग 3(ब), 11(ब), 16(अ) व तिरोडा प्रभाग 10(अ) प्रभावित
गोंदिया(दि.1) : महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील नियम 17(1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने न्यायालयीन अपील दाखल असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 29 नोव्हेंबर 2025 च्या पत्रानुसार गोंदिया व तिरोडा नगरपरिषद निवडणुकांमधील काही प्रभागांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करून नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
गोंदिया नगरपरिषदेसाठी प्रभाग क्र. 3, जागा 3(ब), प्रभाग क्र.11, जागा 11(ब) व प्रभाग क्र.16, जागा 16(अ) तसेच तिरोडा नगरपरिषदेसाठी प्रभाग क्र.10, जागा 10(अ) या जागांवर नव्याने निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार पुढील वेळापत्रक निश्चित :
▪️जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जारी करण्याची तारीख: 4 डिसेंबर 2025
▪️नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत: 10 डिसेंबर 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत
▪️निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर तारीख: 11 डिसेंबर 2025
▪️मतदान: 20 डिसेंबर 2025, सकाळी 7.30 ते सायं. 5.30
▪️मतमोजणी व निकाल: 21 डिसेंबर 2025, सकाळी 10 वाजल्यापासून
▪️शासन राजपत्रात निकाल प्रसिद्धी: 23 डिसेंबर 2025 पूर्वी – कलम 19 नुसार
ही माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी अधिकृत पत्राद्वारे दिली असून संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नवीन वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे.






