हायवे पोलीस व विद्यार्थ्यांसोबत साजरा झाला राहुल दुबाले यांचा वाढदिवस

0
272
1

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला दिला अनोखा संदेश — पोलीस बांधवांना भेटवस्तू, विद्यार्थ्यांत आनंदाची लहर

देवरी : महाराष्ट्र पोलीस बायज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासन गृह विभाग समिती सदस्य राहुल दुबाले यांचा वाढदिवस देवरी येथील वाहतूक पोलीस चेक पोस्टवर सद्भावना उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. मट्टामी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या प्रसंगी विदर्भ सलाहकार संतोष पुंडकर, विदर्भ अध्यक्ष सौ. आरतीताई जांगडे, देवरी तालुका अध्यक्ष सौ. लक्ष्मी ताई मेश्राम, तालुका उपाध्यक्ष योगेश मेश्राम तसेच पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेतर्फे उपस्थित पोलीस दलाला भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले.

यानंतर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, देवरी येथे सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, भेटवस्तू, चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी विदर्भाध्यक्ष सौ. आरती जांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “शिक्षकांनी आधुनिक प्रवाहानुसार विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करावे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस दिल्यास विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील.”

या कार्यक्रमाला कु. व्ही. एम. शिवणकर, कु. अर्चना आर. पुराम, कु. कविता शेंद्रे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन शिक्षक एम. ए. टेंभुर्णे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून वाढदिवस सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 

Previous articleसंसद के शीतकालीन सत्र में ‘पूर्व सांसद महादेवराव शिवणकर ‘ को भूला सदन ?
Next articleप्रा. सौ. धनश्नी राणे यांना आचार्य (Ph.D) पदवी प्रदान!