प्रा. सौ. धनश्नी राणे यांना आचार्य (Ph.D) पदवी प्रदान!

0
562
1

‘आशा’ सेविकांच्या ग्रामीण विकासातील सहभागावर संशोधन; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून पदवी बहाल

आमगाव: येथील प्रतिष्ठित भवभूती महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. धनश्नी राणे यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य (पीएच.डी.) पदवी बहाल केली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. सौ. धनश्नी राणे यांनी प्रा. डॉ. सुनिता बाळापुरे (विभाग प्रमुख, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ, जि. अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले.
‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा (ASHA) सेविकांचा ग्रामीण विकासातील सहभाग: एक अध्ययन’ या महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयावर त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या या संशोधनामुळे ग्रामीण आरोग्य आणि विकास क्षेत्रातील ‘आशा’ सेविकांच्या कार्याला एक नवीन दिशा मिळाली आहे.
प्रा. सौ. धनश्नी राणे यांनी आपल्या या शैक्षणिक यशाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. सुनिता बाळापुरे, भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबु असाटी, प्राचार्य डॉ. पी. के. रहांगडाले, प्राचार्य डॉ. राजेंद्र निकोसे, डॉ. टी. एम. ढेकवार, डॉ. लोकचंद राणे, प्रणव राणे, तसेच त्यांचे आईवडील आणि संपूर्ण कुटुंबियांना दिले आहे.

Previous articleहायवे पोलीस व विद्यार्थ्यांसोबत साजरा झाला राहुल दुबाले यांचा वाढदिवस
Next articleडोंगरगाव (खजरी) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण महोत्सव संपन्न