डोंगरगाव (खजरी) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण महोत्सव संपन्न

0
90
1

डोंगरगाव(खजरी) : मानवतेचे महापुजारी, युगप्रवर्तक, निष्काम कर्मयोगी, क्रांतदर्शी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण महोत्सव दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी श्नीगुरुदेव सेवामंडळ डोंगरगाव (खजरी),ता.-सडक अर्जुनी येथे संपन्न झाला. स्व.  रुपचंद राणे यांनी १९४९ साली सुरु केलेला हा महोत्सव गेल्या ७५ वर्षांपासून येथे साजरा केला जातो.

पुण्यस्मरण महोत्सवाचा शुभारंभ प्रा.डॉ. लोकचंद राणे यांचे शुभ हस्ते अधिष्ठान पूजन व दीप प्रज्वलनाने झाला. याप्रसंगी आपले विचार मांडताना डॉ. लोकचंद राणे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे भारतभूमीत, त्यातल्यात्यात विदर्भात जन्मलेले एक अद् भूत व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारताच्या समूळ परिवर्तनाचे मूळ कशात आहे हे विचारान्ती पूर्णत: ओळखले होते. सुधारणा म्हणजे नुसती मोठमोठ्या शहराची सुधारणा नव्हे , जोपर्यत देशातील सर्व खेडी सुधारणार नाही तोपर्यंत भारत देश सुधारला असे म्हणता येणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडी सुधारली तरच आपला भारत देश प्रगत राष्ट्रात मान्यता पावेल अशी त्यांची धारणा होती. या भूमिकेतूनच त्यांनी भजन, प्रवचन, साहित्य लेखन, सामुदायिक प्रार्थना इ. माध्यमे स्वीकारून मानवतेची व राष्ट्रीयतेची भावना
जागविण्याचा व “ग्रामगीता ” सारख्या ग्रंथातून गावा गावातील, संपूर्ण देशातील जनतेला सुयोग्य दिशा देण्याचे कार्य केले. असे विचार व्यक्त केले.
दिनांक २९ व ३० नोव्हेंबरला सामुदायिक ध्यान, चिंतन, ग्रामगीता वाचन, रामधून,परिसर स्वच्छता व ग्राम स्वच्छता, श्नीगुरुदेव महिला मंडळ, हरी ओम भजन मंडळ, जय गुरुदेव भजन मंडळ, बजरंग भजन मंडळ, गायत्री भजन मंडळ यांची भजने, निबंध व भाषण स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, श्नीगुरुदेव महिला भजन मंडळातील उत्तम भजन गायिकांचा सत्कार, संस्थापक सदस्य  छबिलाल चौव्हान यांचा सत्कार,सामुदायिक प्रार्थना, ह.भ.प. नेमिचंदजी डोये महाराज याचे कीर्तन, शेवटी आचार्य ह.भ.प. मुन्नालालजी ठाकूर महाराज(अखिल भारतीय श्नीगुरुदेव सेवामंडळाचे माजी गोंदिया जिल्हा सेवाधिकारी ) यांचे “गोपाळ काला “कीर्तन झाले.
कार्यक्रमाचे संचालन  ग्यानीराम खोटेले यांनी तर आभार प्रदर्शन  संजय राणे यांनी केले.
महोत्सवाच्या सफलतेसाठी श्नीगुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवक सर्व श्नी सुखदेवजी मानकर,रामकृष्ण जी खोटेले,ग्यानीराम खोटेले, छगनलाल ब्राह्मणकर,वासुदेव मानकर,यशवंत कठाणे,नामदेव कठाणे, खेमचंद राणे,जगदीश कोरे,छगनलाल भेलावे,संजय राणे,यादोराव हुकरे,विनायक लांजेवार, राजूभेंडारकर,योगराज राणे,रामू ब्राह्मणकर,धर्मराज  मानकर,प्रल्हाद मानकर,पुनाजी कठाणे,विष्णूराणे, देवेंद्र कठाणे,यादोरावज कोरे,अशोक खोटेले,रुपचंद मेश्नाम,केशवराव कठाणे, गोवर्धन ब्राह्मणकर,चुन्नीलाल खोटेले,नारायण खोटेले, अशोक कोरे,रमेश ब्राह्मणकर,नारायण खोटेले, बाळकृष्ण खोटेले, माणीक हुकरे,माधोराव भराडे,दूधराम कठाणे, युवराज खोटेले, तसेच जिल्ह्यातील गुरुदेव प्रेमी,गावकरी बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.