

नाशिक : “जिथे कमी, तिथे आम्ही” या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे सप्रे वाडी, शिरसाटे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचे वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली.
फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दप्तर, पेन्सिल, खोडरबर, रंगीत पेन्सिल, पाटी, शार्पनर, हायलाईटर आदी साहित्य देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया होते. यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर व दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांचे सहकार्य लाभले.
यावेळी अध्यक्ष विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शाळेच्या वतीने आभार… शाळेचे सहाय्यक शिक्षक एल एम लोहारे, सोनाली ठाकरे प्रशिक्षणार्थी,तसेच मुख्याध्यापक आर जी शिंदे, यांनी नम्र आभार मानले.
कार्यक्रमास फुलचंद सप्रे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची उपस्थिती लाभली.
स्नेहल देव यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारा आहे.”
एक पाऊल शिक्षणासाठी… एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठी!

