राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महावितरणच्या अभय योजनेचा लाभ घेण्याची… शेवटची संधी

0
156
1

गोंदिया :   गोंदिया जिल्हा अंतर्गत तालुक्यात राष्ट्रीय लोक अदालत दि.२२/०३/२०२५ रोजी नियोजित करण्यात आल्या आहेत.
महावितरण ने लोकप्रिय “अभय योजनेला २०२४” ला मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढ दिली आहे. या अभय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकी रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यात भरणा करून थकबाकी मुक्ती व पुनर विज जोडणीची सुवर्णसंधी या महावितरणच्या अभय योजनेत उपलब्ध आहे.
तसेच, या न्यायालय मध्ये वीज ग्राहकांचा संपूर्ण व्याज विलंब आकार 100% माफ होणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालती” मध्ये महावितरण ने गोंदिया जिल्ह्यातील सूमारे १५५५४ कायमस्वरूपी खंडित असलेले ग्राहकांना लोक अदालत गोंदिया मार्फत प्री लिटिगेशन नोटीस ही देण्यात आले आहेत.

तरी, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी, लोक अदालती मध्ये, महावितरणच्या या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरण गोंदिया तर्फे अपील करण्यात आली आहे.

Previous articleअडपल्ली चक येथे जागतिक वन दिवस साजरा
Next articleजिल्ह्याच्या विकासासाठी खा. प्रफुल पटेल व पालकमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक